मूर्तिजापूरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील चेन हिसकावून चोर पसार…!
———————————
मूर्तिजापूर शहरातील टांगा चौकातील घटना.
अकोला :-मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या परीक्षेत्रातील जुनीवस्ती टांगा चौक परिसरात दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीने
पाठलाग करुन आटोरिक्षातून घराजवळ खाली उतरतांना ६० वर्षीय महिलेच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची चैन हिसकावून पसार झाल्याची घटना सायंकाळी ६ वा ४५ वाजताच्या दरम्यान घडली आहे.
मूर्तिजापूर येथील जेष्ठ पत्रकार स्व. विकास सावरकर यांच्या पत्नी मीना विकास सावरकर ह्या मैत्रणी सोबत स्टेशन विभागातील एका क्लिनिक मधून उपचार घेऊन आपल्या घरी वकील पूरा येथे एका ऑटो ने परतीच्या मार्गावर असतांना त्यांना ऑटो चालकाने टांगा चौक जुनी वस्ती येथे सोडले व मीना सावरकर ह्या तेथून हाकेच्या अंतरावर असलेल्या वकील पूरा च्या दिशेने जात असतांना अचानक दुचाकी वरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील २५ ग्राम सोन्याची चैन हिसकावून पसार झाला आहे. ज्या सोन्याच्या दागिन्याची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपयांचे असल्याची प्राथमिक माहिती बोलल्या जात असून घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात चोरट्याचा शोध घेण्याकरिता एक पथक रवाना करण्यात आले असून प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पोलीस पंचनामा करीत आहे. वृत्त लिहेस्तोर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
_________________________________
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News मूर्तिजापूर – अकोला