हातगाव येथे राजस्व मंडळाच्या वतीने सुशासन दिन संपन्न..!
हातगाव येथे राजस्व मंडळाच्या वतीने सुशासन दिन संपन्न..!
—————————————
मूर्तिजापूर :- महसुल विभाग,तहसील कार्यालया च्या वतीने प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने शुक्रवार दि.२० रोजी राजस्व मंडळ हातगांव अंतगर्त ग्रामपंचायत हातगांव येथे सुशासन दिनानिमित्त विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी नायब तहसीलदार आर.एस.राऊत यांनी उपस्थितांना शासनाच्या विविध योजनासंबंधी माहिती देत शासनाच्या आगामी महत्वाकांक्षी AgriStack प्रकल्पाविषयी मार्गदर्शन करून या प्रकल्पाचे महत्व पटवून दिले व या प्रकल्पाकरिता शासनास सहकार्य करण्याचे तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध अनुदानाचा लाभ मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली वैयक्तिक जबाबदारी म्हणून ई-पिक पाहणी करून घ्यावी असे आवाहन सर्व शेतकरी लाभार्थ्यांना केले. यावेळी विविध शैक्षणिक दाखले वाटप, प्रलंबीत प्रकरणाचा निपटारा करून लाभार्थ्यांना आदेश वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा.तहसीलदार मुर्तिजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी आर.एस.पुरी राजस्व मंडळ हातगांव यांच्या नियोजनात हातगाव चे ग्राम महसुल अधिकारी डी.टी.ठाकरे, अभिजित गिरी ग्राम महसुल अधिकारी शेलुवेताळ, आर.एस.खंडारे ग्राम महसुल अधिकारी मुरंबा, कु.वैशाली राऊत ग्राम महसुल अधिकारी उमरी, रिना अंजुम शेख ग्राम महसुल अधिकारी हेंडज यांनी परिश्रम घेतले. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकांत डांगे महसुल सेवक हातगांव तर आभार प्रदर्शन कृष्णा ठाकूर महसुल सेवक उमरी यांनी केले.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.