बकऱ्या चोरणाऱ्या टोलीस शहर पोलिसांनी केले जेरबंद..!
—————————————-
शहर पोलिसांची धाडसी कारवाई, ५ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त..
अकोला:- जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील बकऱ्यांची चोरी करून निर्दयतेने कार च्या डिक्कीत कोंबून वाहतूक करणाऱ्या टोळीला तारेवरची कसरत करून अखेर बडनेरा येथे मूर्तिजापूर शहर पोलिसांना जरबंद करण्यात यश आलाय.
गेल्या काही दिवसांपासून शहरात बकऱ्या तसेच जनावरे चोरीच्या घटनामध्ये मोठी वाढ झाली होती. मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग परिसरातील टेलिफोन कॉलनीतून सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास ५४ हजार किंमतीच्या ५ बकऱ्या चोरून निर्दयतेने कारच्या डिक्कीत कोंबून चोरटे वाहतूक करीत असतांना श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यास संशय आल्याने त्यांनी कार अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु गाडीत चोरी केलेल्या बकऱ्या असल्याने चोरट्यांनी वाहतूक पोलिसांना न जुमानता भरदावं वेगाने गाडी पालवली पोलिसांना गाडीत काही असल्याच्या संशया वरून तात्काळ पोलीस स्टेशनला माहिती देत गाडीचा पाठलाग करीत असतांना सदर कार चालकाने लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय, विर भगतसिंग चौकातून कसलाही विचार न करिता सैरावैरा बेभान गाडी चालवीत मोहम्मदिया प्लॉट मार्गे राष्ट्रीय महामार्गाने अमरावती च्या दिशेने जात असतांना शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात आपल्या जीवाची बाजी लावत कारचा पाठलाग करीत उपनिरीक्षक आशिष शिंदे, सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, विनोद कुंबरे, सचिन दुबे, गजानन खेडकर, मंगेश विल्हेकर, गजानन ठाकरे, साजिद खान, सोमनाथ फुके व माना पोलीस स्टेशन चे उमेश हरमकर, पंकज वाघमारे यांनी अखेर बडनेरा नजिक आरोपी मोहम्मद फैजान वय ३९, वशी वय २२ व मारोती एक्सस्टीम कंपनीची कार क्रमांक एम. पी. ०४ एच. ए १२१४ चा चालक वाजीद अली वय ३६ राहणार सर्व भोपाळ यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून पोलिसांनी एक मारोती एक्सस्टीम कंपनीची कार किंमत ५ लक्ष रुपये व ५ बकऱ्यांची किंमत ५४ हजार असा एकूण ५ लाख ५४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात शहर पोलीस करीत आहेत.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.