अकोट शहरात गणपती विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक…!
———————————
अकोट शहरात तणावपूर्ण शांतता..
एका प्रार्थना स्थळावरून गणपती मिरवणुकीवर केल्याने दगडफेक
———————————
अकोला – अकोट शहरात गणेश विसर्जन मिरवणुक शांततेत सुरू असताना स्थानिक नंदीपेठ भागात अचानक दगडफेक झाल्याने एकच धावपळ झाली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असल्याची माहिती आहे.
प्राप्त माहिती नुसार दि. १८ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास नंदीपेठ भागातून त्या परिसरातील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर एका प्रार्थना स्थळा जवळून जात असताना. काही समाज कंटकानी मिरवणूकीवर दगडाचा वर्षाव केला त्यामध्ये काही गणेश भक्त जखमी झाले आहे. घटना कळताच स्थानिक पोलीस व शहर पो.स्टे. ठाणेदार अमोल माळवे, अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक शंकर शेळके हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी काही युवकांना ताब्यात घेतले आहे.
नंदीपेठ भागातील इतर गणेश मंडळांना पोलिसांच्या मदतीने दगडफेकीच्या क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले. त्या मंडळांना मुख्य मिरवणूकीमध्ये सामील होण्यासाठी नेण्यात आले होते. दगडफेक झाल्यानंतर या परिसरातील मंडळ संयम दाखवीत मिरवणुकीत सहभागी झाले होते. सध्या या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी ते करत आहेत.
———————–
दुपारी बाजारपेठ बंद
दुपारी ४ वा.च्या सुमारास ही घटना घडताच शहरात अफवाचे पेव फुटले भीती पोटी व्यापाऱ्यांनी बाजारपेठ ताबडतोब बंद केली होती. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जखमींवर अकोला येथे उपचार
दगडफेकीत जखमी झालेल्या दोघांना प्राथमिक उपचारानंतर अकोला येथे सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आले. इतर सात जणांना किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे. वृत्त लिहेपर्यंत जखमीचे नावे कळू शकली नाही. पोलिसांकडून दगडफेक करण्याचा संशय असणाऱ्या समाज कंटकांची धरपकड सुरू केली आहे.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोट -अकोला.