नेत्र शिबिरात शेकडो रुग्णांची झाली मोफत तपासणी
शेगावात राजकीयंसह डॉक्टरांनी घातले गजानन महाराजांना साकडे
शेगाव. शिवसेनेच्या वतीने आज रविवारी संतनगरी शेगावात शिवसेनेकडून भव्य नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या महाआरतीमध्ये शेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांचे आरोग्य सुख समृद्धीचे जावो यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे राजकीयंसह जिल्हाभरातील तज्ञ डॉक्टरांनी घातलेबुलढाणा जिल्ह्याचे भूमिपुत्र केंद्रीय आरोग्य मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या संकल्पनेतून शेगावात आयोजित करण्यात आलेले शिबिर घाटाखालील जिल्हाप्रमुख शांताराम दाणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या शिबिरामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात पार पडलेल्या या भव्य शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टरांनी शेकडो रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. याशिवाय ज्यांना डोळ्यावरील शस्त्रक्रियेची गरज आहे अशांची निवड करून त्यांना शाश्त्रक्रियेसाठी तारीख देण्यात अली.
बाईट – रामा थारकर (तालुकाप्रमुख, शिवसेना)
बाईट – शारदा पाटील (जिल्हाप्रमुख, महिला शिवसेना)
बाईट- डॉ. नाफडे (वैद्यकीय अधीक्षक, शेगाव
—————————————-
जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख, CEN News शेगाव -बुलढाणा.