रोजगार मेळाव्याच्या नावाखाली युवकांची दिशाभूल
———
रवि राठींनी रोजगार मेळाव्यात बेरोजगारांकडून पैसे उकळले
———
मूर्तिजापूर :- येथील समाज सेवकाचा बुरखा पांघरलेल्या रवि राठी मूर्तिजापूरात अनेक रोजगार मेळावे घेतले या रोजगार मेळाव्याला नौकरी मिळण्याच्या आशेपोटी हजारो बेरोजगार युवक – युवतींनी हजेरी लावली परंतु रोजगार तर मिळालाच नाही पण या युवकांच्या पदरचे ३५० रोजगार मेळाव्याच्या नावाखाली रवि राठी यांनी जमा केल्याची खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
समाजसेवक असल्याचे नाटक करीत असलेल्या मूर्तिजापूर येथील रवि राठी यांनी मतदारसंघात अनेक रोजगार मेळावे घेऊन या रोजगार मेळाव्याला उपस्थित युवकांकडून रवि राठी यांनी प्रत्येक ३५० रुपये वसूल करुन लाखो रुपयांची माया गोळा केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून या मतदार संघात घेतलेले रोजगार मेळावे आणि त्यातून गोळा केलाला पैसा हा आता निवडणूकीसाठी उपयोगात आणल्या जात असल्याच्या चर्चेला पेव फुटले आहे. सातत्याने या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणाऱ्या रवि राठींचा समाज सेवेचा बुरखा अखेर टराटरा फाटला आहे. कुठल्याच पक्षाने त्यांना जवळ उभे केले नसल्याने शेवटी अपक्ष उमेदवारी दाखल करावी लागली. रोजगार मेळाव्याच्या नावाखाली रवि राठी यांनी युवकांना रोजगार उपलब्ध करुन देण्याच्या भूलथापा देत ३५० रुपये वसूल करुन त्या संदर्भात मेळाव्याच्या ठिकाणी कंपनीत रोजगार उपलब्ध असून तुम्ही पुणे येथे येऊ कंपनीत जॉईन होण्यासाठी तसे पत्रही देण्यात आले, आपल्या नौकरी मिळणार या आशेने यातील काही बेरोजगार युवकांनी थेट पुणे गाठून कंपनी जॉईन होण्यासाठी गेले असता कंपनी कडून त्यांना दहा हजार रुपयांची मागणी करण्यात आली. घरची परिस्थिती हलाकीची असल्याने ते युवक दहा हजार भरण्यास असमर्थ असल्याने गेल्या पावली हिरमुसल्या चेहऱ्याने परत आले. तीनशे पन्नास अधिक पुण्याला जाण्या येण्याचा खर्च सदर युवकांच्या बोकांडी बसला, आपला मुलगा – मुलगी नौकरी करण्यासाठी पुण्याला जातोय यासाठी पालकांनी पदरमोड करुन त्यांच्या खिशात दोन तीन हजार टाकले, परंतु तेही पैसे खर्च झाले, मात्र रवि राठी यांचा यात मोठा फायदा झाला असून निवडणुकीत त्यांना धडा शिकविण्याचा चंग या युवकांनी बांधला आहे.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला