डोंबिवलीत रवींद्रनाथ टागोर यांचे घर तोडल्याच्या निषेधार्थ भाजपचे तीव्र आंदोलन
डोंबिवली : प्रख्यात कवी, साहित्यिक आणि नोबेल पारितोषिक विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचे बंगालमधील घर तोडल्याच्या घटनेने देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच घटनेचा तीव्र निषेध करत डोंबिवली पूर्वेतील इंदिरा गांधी चौकात आज भाजपच्या वतीने निषेध आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी या कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करत, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.