डोंबिवलीत १५ वर्षीय मुलीचा आपल्या वडिलांकडून विनयभंग..!
—————————————————————-
डोंबिवली :- बदलापूर, नांदेड व अकोल्या च्या घटनेची आग शांत ही होत नाही तर पुन्हा डोंबिवलीच्या मानपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत एका वडिलानेच आपल्या १५ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. वडिलांच्या या कृत्याला विरोध करणाऱ्या पीडित मुलीच्या शाळेची पुस्तके आणि गणवेश रागाच्या भरात वडिलांनी जाळून टाकल्याचा प्रकारही घडला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी वडिलांविरोधात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पोस्कोचा गुन्हा दाखल करत आरोपीस अटक करण्यात आलीये. विनयभंगाचा जेव्हा प्रकार घडला तेव्हा पीडित मुलीची आई घरात नव्हती. पीडित मुलीने आई आल्यानंतर तिला वडिलांकडून घातलेला प्रकार सांगितला. यावेळी पीडित मुलीची आई आणि वडील यांच्यात वाद झाला. या वादात वडिलांनी आई आणि पीडित मुलीला मारहाणही केली. घडलेला प्रकार आईला सांगितला म्हणून पीडित मुलीचे कपाटात ठेवलेली शाळेची पुस्तके आणि गणवेश रागाच्या भरात वडिलांनी जाळून टाकल्याचेही पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.
राज्यात महिला भगिनींवर होत असलेल्या अत्याचाराचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत असून कुठेतरी या नराधमांवर कारवाई करण्यात प्रशासन कमकुवत पडत आहे की काय..? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मुंबई.