समाजातून अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून स्मशान भूमीत पत्रकारांची दिवाळी..!
—————————————-
मूर्तिजापूर :- हिंदू धर्मातील दिवाळीचा सण हा सगळ्यात मोठा सण मानला जातो. हा सण लहान पासून ते थोरांपर्यंत, गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत अनेक वेगवेगळ्या पद्धतीने दिवाळी साजरी करतात. अशीच दिवाळी ही मूर्तिजापूर येथील पत्रकार बांधवांच्या च्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी न करता हिंदू स्मशानभूमीत दिवे लावून साजरी केली.
स्मशानभूमी म्हटलं की खूप जणांना भीती वाटते. मात्र जिथे जन्म होतो ते रूग्णालय आणि जिथे या जगाचा निरोप घेतला जातो ते स्मशानभूमी. समाजातील प्रत्येक नागरिकांना अंधश्रद्धेच्या मोहातून बाहेर काढण्यासाठी मूर्तिजापूर येथील पत्रकारांनी अंधश्रद्धेला फाटा देत स्मशानभूमीत दिवाळी दिवे लावून साजरी केली.
मूर्तिजापूर येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ लगत असलेल्या हिंदू स्मशानभूमीतील भगवान शंकराच्या मूर्ती चे पूजन करून स्मशानात व मूर्ती समोर दिवे लावून अनोख्या पद्धतीने प्रथमच मूर्तीच्यापुरात पत्रकार बांधवांच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रा. दिपक जोशी,समाधान इंगळे,संजय उमक,बाळासाहेब गणोरकर, प्रा. एल. डी. सरोदे, प्रतिक कुऱ्हेकर, मिलिंद जामनिक,सुमित गुल्हाने, मोहम्मद शब्बीर, रोहित सोळंके, नरेंद्र खवले, अथर खान आदी पत्रकार उपस्थित होते.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.