मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सक्रीय सहभागी नोंदवा
– जिल्हाधिकारी सौरभ कटियार
———————————
अमरावती :- लोकसभा निवडणुकीत प्रशासन, नागरिक आणि संस्थांच्या मदतीने व्यापक जनजागृती मोहिम राबविण्यात आली. याचा परिणाम म्हणून मतदानाची टक्केवारीत तीन टक्यां्कनी वाढ झाली. सर्वांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले आहे. या विधानसभा निवडणुकीतही सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवत मतदानाचा टक्का वाढवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
नियेाजन भवनात मतदार जनजागृतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजीता महापात्र, महापालिका आयुक्त सचिन कलंत्रे, उपायुक्त कल्पना बावरकर, कौन बनेगा करोडपतीच्या विजेत्या बबीता ताडे यांच्यासह विविध संस्था, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी, लोकसभा निवडणुकीत संस्था आणि संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. यातून मतदारांमध्ये जनजागृतीसोबतच त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचे कार्य करण्यात आले. इतर ठिकाणी कमी मतदान झालेले असताना आपल्या जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढली हे स्वीप उपक्रमांचे यश आहे. समाजातील युवक, महिला, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, तृतीयपंथी अशा सर्व घटकांना उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अमरावती.