राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन..!
अकोला :- शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मूर्तिजापूर येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ घोषित करावा, सरसकट पीक विमा मिळावा, शेत रस्त्याकरिता निधी उपलब्ध करावा, सोयाबीनला सात हजार रुपयापेक्षा अधिक भाव द्यावा, २०२३ चा ७५ टक्के न पीक विमा मिळावा आदी मागण्यांच्या संदर्भात धरणे आंदोलन करण्यात आले. माजी आमदार सहकार नेते भैय्यासाहेब तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत तथा जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे यांच्या मार्गदर्शनात तहसील कार्यालयावर घरणे आंदोलन करण्यात आले. घरणे आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश संघटक सम्राट डोंगरदिवे व प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे यांनी शेतकऱ्यांना संबोधित केले. मूर्तिजापुरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
कॉंग्रेस पक्षाचे सरकार आल्यास शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असे सांगितले. धरणे आंदोलनात माजी आमदार भैय्यासाहेब तिडके, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे,अनिरुद्ध तिड़के,राष्ट्रीय सरचिटणीस आशा मिरगे, जि.प. सदस्य सम्राट डोंगरदिवे, ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष इब्राहिम घानीवाला, तेजस जामठे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुषमा कावरे, सुषमा,श्रीधर मोरे, परिमल लहाने, विष्णू लोडम, मंगेश कुकडे, राम कोरडे, रंजना सरदार, सचिव गावंडे,आशीष नवघरे, नितिन टाले,वैभव कानकिरद,दीपाली देशमुख यासह तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
———————————
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.