इंटरनॅशनल स्कूल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मध्ये दहीहंडी उत्सव साजरा..!
अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील इंटरनॅशनल स्कुल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन शाळेच्या प्रांगणात
दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शाळेतल्या विद्यार्थ्यांनी राधा-कृष्णाची वेशभूषा व रंगबेरंगी कपडे परिधान करून नृत्य सादर केले.यावेळी विद्यार्थ्यांनी ” हत्ती घोडा पालखी, जय कन्हाय्या लालकी” चा जयघोष केला. तसेच विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळकाला करण्यात आले. या दहीहंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ प्रणाली प्रविण भटकर(माँ) ,तृप्ती बुटे, वैशाली अढाऊ, प्रतिक्षा कुऱ्हेकर, काजल ठाकरे, प्रियांका अंभोरे, रुपाली हुरबडे, रेखा देशमुख , वैष्णवी बावणे, अनुराधा वानखडे, दिशा कावरे, रमा हरणे , रेश्मा खरड, सुरेखा पराते, दिपीका बोळे , सुजता मोरे ,मिनाक्षी सातपुते, मयुरी जावरकर, व्हीलसन सिरसाठ, श्रीकृष्ण तायडे, विशाल गावंडे तसेच सर्व शिक्षक,कर्मचारी, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.