“चला रे आरत्यांनो, आपण जाऊ जोगव्याला” च्या गजरात निलेश शर्मा मंत्रमुग्ध…!
___________
वंदे मातरम नवदुर्गा उत्सव मंडळातर्फे महाआरती संपन्न..
____________
अकोला :- जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील स्टेशन विभाग स्थित असलेल्या ” वंदे मातरम” नवदुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने महाआरतीचे आयोजन करण्यात आले. शारदीय नवरात्र उत्सवाला अश्विन शुद्ध प्रतिपदा पासून सुरवात करण्यात आली तर अश्विन शुद्ध नवमी या नऊ दिवसांच्या काळात देवीची उपासना केली जाते. नवरात्रोत्सवासाठी मुर्तीजापुर शहरातील स्टेशन विभाग स्थित असलेल्या ” वंदे मातरम” नवदुर्गा उत्सव मंडळाची एक वेगळीच ख्याती असून गेल्या ५० ते ५५ वर्षांपासून सदर मंडळात नवरात्र उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो.
समाजसेवक निलेश उर्फ (गंपू) रमेशचंद्र शर्मा यांच्या मार्गदर्शनात नवरात्र उत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेला मोठ्या जल्लोषात विविध देखव्यांसह जगदंबेचे आगमन केल्या जाते विशेष म्हणजे ” वंदे मातरम” नवदुर्गा उत्सव मंडळाची मिरवणूक बघण्याकरिता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात तालुक्यातील जवळपास ७ ते ८ हजार महिला, युवक, युवतींची विशेष गर्दी पाहावयास मिळते.
समाजसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा व रितेश शर्मा हे दोघे भावंड नवरात्र उत्सवातील जगदंबेच्या आरतीच्या वेळी देवीच्या आराधनेत मंत्रमुग्ध होऊन तल्लीन होतात. विशेष बघायचं झालं तर या मंडळाच्याच नावाने समाजसेवक निलेश उर्फ गंपू शर्मा हे आपल्या मित्र परिवारांसह ” वंदे मातरम” नवदुर्गा उत्सव मंडळ, ” वंदे मातरम” आपत्कालीन पथक ही चालवीतात या माध्यमातून गरजवंतांना मदत कार्य करणे तसेच अपघातग्रस्त स्थळे धावून जाऊन वंदे मातरम आपत्कालीन पथकाच्या माध्यमातून मदत देत अनेक अपकातग्रस्तांचे प्राणही वाचवले असल्याचे सांगण्यात येते.
___________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.