अकोला :- मूर्तिजापूर येथे आयोजित शेतकरी संवाद सभा प्रसंगी पत्रकार परिषदेत बोलताना शेतकरी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार राजू शेट्टी.
सरकारच्या मानगुटीवर बसल्याशिवाय शेतकरी हिताचे धोरण येणार नाही – राजू शेट्टी
प्रकाश पोहरे व राजू शेट्टी यांनी साधला संवाद
थेट खाण्याचे धान्य शेतकऱ्यांनी पिकवू नये
दोन वर्षात सरकार वठणीवर येईल
घटक पक्ष सोबत घेऊन निवडणूक लढवू
अकोला /मूर्तिजापूर :-
कापूस, सोयाबीन आयातीला सरकारने परवानगी दिल्याने सोयाबीन व कापसाचे भाव पडले आहेत. एमएसपी गॅरंटीचा फायदा केवळ ७ टक्के लोकांना मिळतो प्रत्येक्ष शेतकऱ्याच्या वाट्याला येत नाही, सरकारच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे, जोपर्यंत सरकारच्या मानगुटीवर बसणार नाही तो पर्यंत शेतकरी हिताचे धोरण येणार नाही असे प्रतिपादन शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मूर्तिजापूर येथील ६ ऑगस्ट रोजी शेतकरी चळवळीतील कार्यकर्ता संवाद सभेत बोलताना केले.
सरकारने आयातीवर भर दिला, सोयाबीनच्या ऑर्गनीक प्रोटीन निर्यातीला वाव दिला असता तर सोयाबीनला चांगला भाव मिळता असता. शेती आणि वस्त्रोद्योगाला प्राधान्य दिल्याशिवाय रोजगार निर्मितीला पर्याय नाही. देशात पाम तेलाची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते त्यातेलाची इतर तेलात भेसळ अर्थात ब्लेडिंग केली जाते हा प्रकार बंद करण्यासाठी आपण एक याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाची त्यांनी पोलखोल केली. महाराष्ट्रातील छोटे घटक पक्ष सोबत घेऊन विधान सभेच्या सर्व जागा लढविणार, त्या संदर्भात आमची बोलणी सुरू असून लवकरच चित्र स्पष्ट होईल असे विधान सभा निवडणुकीतच्या पार्श्वभूमीवर एका प्रश्नाच्या उत्तरात राजू शेट्टी यांनी सांगितले.
शेतकरी नेते प्रकाश पोहरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना दिल्ली झालेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांचा बळी गेला त्या बद्दल देशाच्या पंतप्रधानाला काही घेणे देणे नाही, ८० कोटी लोकांना मुक्त धान्य देवून केवळ शेतकऱ्यांच्या जिवावर फुशारक्या मारणारे सरकार आहे, शेती विकावी हाच या सरकारचा मुळ उद्देश आहे, सरकार येण्या आधी यातीलच काहींनी कापसाला १० हजार रुपये भाव मागीतला होता तेच आता सत्तेत आहेत पण ते कापसाला १० भाव देऊ शकले नाहीत, सरकारवर ‘प्रहार’ केला, सरकारला ताळ्यावर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट खाण्याचे धान्य न पिकवता सुर्यफूल, सोयाबीन, ज्युट या सारख्या पिकाची लागवड करावी असा सल्लाही प्रकाश पोहरे यांनी यावेळी दिला.
या संवाद सभेचे आयोजन जनमंच मूर्तिजापूर व प्रगती शेतकरी मंडळ यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू वानखडे यांनी केले, संचलन प्रा. सुधाकर गौरखेड तर आभार देविदास बांगड यांनी मानले, या संवाद सभेला शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News , अकोला.