राहुल कांबळे नवी मुंबई
‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ कार्यक्रमाला नवी मुंबईत लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबईचे लाडके ‘दादा’ लोकनेते आ. गणेश नाईक यांना भगिनींनी बांधल्या राख्या
नवी मुंबईच्या विकासासाठी, माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी कटिबद्ध – लोकनेते आ. गणेश नाईक
नवी मुंबई प्रतिनिधी
लाडकी बहीण योजना सुरू करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमाला नवी मुंबईत लाडक्या बहिणींची प्रचंड उपस्थिती लाभली. भाजपा नवी मुंबई महिला मोर्चाच्या वतीने कोपरखैरणे येथे आयोजित या कार्यक्रमास पाच हजारांच्या आसपास लाडक्या बहिणी एकत्र आल्या होत्या. फटाक्यांची आतिशबाजी, संगीत, ढोल ताशांच्या गजरात लाडकी बहिण योजनेचा आनंद साजरा करण्यात आला.
लोकनेते आमदार गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी आमदार तथा नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्ष प्राध्यापिका वर्षा भोसले, माजी महापौर जयवंत सुतार, नवी मुंबई भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा माधुरी सुतार, महामंत्री नेत्रा शिर्के यांच्यासह महिला लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होत्या.
‘लाडक्या बहिणींचा देवाभाऊ’ या कार्यक्रमांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणीशी ऑनलाइन संवाद साधला. लाडकी बहीण योजनेसाठी महिलांनी देवा भाऊंचे आभार मानले. या योजनेमुळे आम्हाला आधार मिळाला असून ही योजना सुरूच ठेवण्याचे आवाहन महिलांनी केले त्याचबरोबर भाऊ म्हणून राज्यातील बहिणींच्या पाठीशी उभे राहण्याची विनंती केली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योजना सुरूच राहणार असून लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे त्यांच्या सक्षमीकरणांच्या योजना हाती घेऊ शकलो. देशाचा विकास करायचा असेल तर महिला भगिनींना विकासाच्या मुख्य धारेत आणणार असल्याची ग्वाही दिली.
लाडकी बहीण योजनेत देवेंद्र फडणवीस यांचा सिंहाचा वाटा- लोकनेते आ. गणेश नाईक
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासपुरुष असून शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, जेष्ठ, दिव्यांग अशा सर्व घटकांचे कल्याण त्यांनी केले आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा असून ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे, असे लोकनेते आमदार गणेश नाईक म्हणाले.
नवी मुंबईच्या हितासाठी कटिबद्ध
नवी मुंबईमधील सुजान जनतेने एखाद्या नेतृत्वाच्या हातामध्ये 25 वर्षे एका शहराचा कारभार देणं, नवी मुंबई हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी आणि नवी मुंबईकरांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही लोकनेते आमदार नाईक यांनी यावेळी दिली. महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबईसाठी मोरबे धरण विकत घेण्याचा निर्णय घेतल्याने आज शहरातील माता-भगिनींना पाण्यासाठी त्रास होत नाही. नवी मुंबईची पाणीपुरवठ्याची कायमची तरतूद करण्यासाठी 2000 एमएलडी क्षमतेचा भिरा पाणी प्रकल्प सुचवला आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही सुरू आहे. वीस वर्षे मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढू देणार नाही हा शब्द दिला होता तो शब्द पाळला. पुढील वीस वर्षे देखील कोणत्याही प्रकारची करवाढ होऊ देणार नाही. नवी मुंबईतील 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ता करमाफीचा निर्णय शासनाकडून मंजूर करून घेतला आहे. एनएनएमटीच्या बसेस मध्ये ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची ठेवून इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात येत असून सर्वसामान्य घरातील मुले देखील या शाळांमधून शिक्षण घेत प्रगती करतील. नवी मुंबई शहराच्या भविष्यकालीन नागरी गरजांची पूर्तता करण्यासाठी सिडकोने सुविधा भूखंड द्यावेत यासाठी विधानसभेत आवाज उठवला त्या अनुषंगाने देखील सकारात्मक कार्यवाही होणार आहे. प्रकल्पग्रस्त आणि झोपडपट्टी धारकांची आजपर्यंतची गरजे पोटीची सर्व बांधकामे मालकी हक्कासह नियमित करून त्यांच्या इच्छेनुसार विकास योजना शासनाने राबवावी असे नमूद करून लोकनेते आमदार नाईक यांनी नवी मुंबईचा भविष्यकाळ उज्वल आहे. नवी मुंबईच्या विकासासाठी आणि माता भगिनींच्या सक्षमीकरणासाठी कटीबद्ध असल्याचा शब्द उपस्थित लाडक्या बहिणींना दिला.
राज्यात देवा भाऊ तर नवी मुंबई दादा बहिणींचे रक्षणकर्ते – प्रा. वर्षा भोसले
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना उपाध्यक्षा प्राध्यापिका वर्षा भोसले यांनी राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवे…