आगामी होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाने कसली कंबर…!
—————————————-
भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभरात मोठ्या जोमाने सदस्य नोंदणी..
—————————————
मुंबई :- भारतीय जनता पार्टी च्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासमोर महा सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला घवघवीत यश प्राप्त झाल्यानंतर आगामी राज्यात होऊ घातलेल्या महानगरपालिका, नगरपरिषद व जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभर मोठ्या जोमाने भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा च्या वतीने सदस्यता नोंदणी अभियान प्रत्येक शहराच्या मुख्य चौकात, रेल्वे स्टेशन परिसर, बस स्थानक परिसरात राबविण्यात येत आहे.
या नोंदणी अभियानास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.यावेळी भा. ज. पा च्या महिला मोर्चा चिटणीस सौ. रश्मी जाधव,
महिला मोर्चा प्रदेश सचिव सौ. मीनल सचिन मोरे,जिल्हाध्यक्षा सौ. मृणाल पेंडसे, कोषाध्यक्ष सौ भारती चौधरी आदी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तर यावेळी विधान परिषदेच्या आमदार तथा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष सौ चित्राताई वाघ यांनी आपली उपस्थिती भूषविली.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मुंबई.