भजन संध्याच्या नावावर जनतेला धरले वेठीस…!
——————————–
मुख्य रस्त्यावरच कार्यक्रम घेतल्याने जनतेचे हाल.
——————————–
मूर्तिजापूरातील राजकारणी उठले जनतेच्या जीवावर..?
———————————
बस स्थानका पासून बस केल्या दोन किलोमीटर दूर उभ्या.
———————————
अकोला :-
जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात अनेक राजकारण्यांनी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी मिळण्यासाठी अनेक फंडे अवलंबले आहे, या नादात मात्र आतापासूनच जनतेला वेठीस धरुन अक्षरशः त्यांचे हाल करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबविल्या जात असल्याने नागरीकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
१५ सप्टेंबर रोजी असाच गायीका शहनाज अख्तर यांच्या गायनाचा कार्यक्रम शरद पवार गटाचा राष्ट्रवादी. कॉग्रेसचा नेता समजणाऱ्या व उमेदवारी मिळविण्याच्या शर्यतीत एका संभाव्य उमेदवारांने आयोजीत केला होता, सदर कार्यक्रम मूर्तिजापूरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जुन्या शहरात जानारा वर्दळीचा मुख्य रस्ताच बंद केल्याने वाहतुकीसाठी मोठा खोळंबा निर्माण झाला होता, एवढेच नव्हे तर बस स्थानकावर जाणाऱ्या बस देखील बस देखील बंद करण्यात आल्याने बस स्थानका पासून दोन किलोमीटर बायपासवर बस थांबा करण्यात आला असल्याने बस स्थानकापासून बायपास पर्यंत प्रवाशांना ऑटो रिक्षा करुन जावे लागल्याने प्रवाशांना अकारण भुर्दंड सहन करावा लागला यामुळे प्रवासी प्रचंड संतप्त झाले होते. राजकीय स्वार्थासाठी येथे भावी उमेदवारांकडून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे गर्दी गोळा करण्यासाठी घेतले कार्यक्रम मुख्य रस्त्यावर आयोजीत करुन राजकारणी जनतेच्या जीवावर उठले आहे. शहरात अनेक मैदान असताना असे कार्यक्रम मैदानावर असावेत अशा भावना मूर्तिजापूरकरांनी व्यक्त केल्या. आधीच लहान रस्ता असल्याने या चौकात नेहमीच गर्दी असते शहरात अनेक मैदाने खाली असताना रस्त्यावर कार्यक्रम घेण्याचा अट्टाहास करण्यात आला, यासाठी नगर परिषदने नाहरकत कशी दिली, आधीच शहरात वाहतुकीला शिस्त नाही, गणपती उत्सव, त्यातही अशा रस्त्यावरील कार्यक्रमाला पोलीस प्रशासनाने परवानगी कशी दिली असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. दरम्यान एक महिला दुचाकीचा अपघात होऊन जखमी झाल्याची माहिती आहे. नगपरीषदे केवळ जागेसाठी नाहरकत दिली आहे परवानगी देणे पोलिसांचे काम आहे असे मुख्याधिकारी शेषराव टाले यांचे म्हणणे आहे तर नगर परिषदेने नाहरकत दिल्याने आम्ही कार्यक्रमाला परवानगी दिल्याचे शहर पोलीस निरीक्षक अजित जाधव यांचे म्हणणे असले तरी भजन गायनाचा कार्यक्रम असल्याने सहाजिकच या कार्यालयाला महिला जमल्या परंतू महिलांना बसण्याची वेगळी व्यवस्था नसल्याने महिला पुरुष एकत्र उभे राहून कार्यक्रम बघत होते, जिल्ह्यात व तालुक्यात महिला विनयभंगाचे प्रकार अलीकडेच मोठ्या प्रमाणात घडले, घटना ताज्या असताना यासाठी पुर्वीच पोलीसांनी महिला सुरक्षा लक्षात घेता परवानगी नाकारायला हवी होती, असे प्रतिपादन मंत्रालय महिला समन्वय समितीतीच्या सदस्य तथा सामाजिक कार्यकर्त्या रजनी पवार यांनी केले आहे.
—————–
कॅमेरामन शाम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतीक कुऱ्हेकर, CEN News अकोला.