“शिवसेना जनसंवाद दौऱ्यातील संवाद: विकासकामांची माहिती आणि शासकीय योजनांचा लाभ”
शिवसेना पूर्व सांसद राहुल शेवाले चा नेतृत्व खाली संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जनसंवाद दौऱ्याच्या अखेरच्या सत्रात मुंबई दक्षिण मध्य लोकसभा क्षेत्रातील अणुशक्ती नगर आणि चेंबूर विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या वतीने सामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना यावेळी पदाधिकाऱ्यांना दिल्या. तसेच, आपल्या मतदारसंघांमध्ये पूर्ण झालेल्या आणि प्रगतीपथावर असलेल्या विकासकामांची माहिती जनतेला देण्यासाठी प्रभावीपणे समाज माध्यमांचा वापर करण्याबाबत देखील सूचना दिल्या.
या जनसंवाद दौऱ्याला शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, खासदार नरेश म्हस्के, आमदार मनीषा कायंदे, शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, प्रवक्त्या शीतल म्हात्रे, प्रवक्ते संजय निरुपम, नेत्या मीना कांबळी, उपनेत्या कला शिंदे, सचिव सिद्धेश कदम यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.