जिल्ह्यात बदलापूर घटनेचा महाविकास आघाडी कडून निषेध..!
____________
अकोला :-
बदलापूर येथे चिमुकलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडू महाराष्ट्र बंदची हाक दिली, परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र बंद करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले, त्या धर्तीवर बंद न करता अकोलासह जिल्ह्यात विविध ठिकाणी तोंडाला काळ्या फिती लावून निषेध नोंदविण्यात आला. बदलापूर पाठोपाठ एकाच आठवड्यात अकोला जिल्ह्यातही तीन घटना घडल्या.
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी जिल्हाभरातून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकवटून काळ्या फिती लावून महायुती सरकारचा जाहीर निषेध नोंदविला, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली चालत असलेले सरकार राज्यातील महिलेच्या संरक्षणासाठी कुचमामी असल्याचे सांगून या सरकारने ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणीही निषेदकर्त्यानी केली. हे सरकार पोलीसांना बदनाम करत असून सरकारने अशा अन्याय करणारा विरूद्ध ठोस पाऊले उचलण्याचीही मागणी केली व महाविकास आघाडीसरकारणे पारीत केलेला ‘शक्ति’ अमल बजावणी करुन पिडीतेला न्याय देऊन अशा नराधमाला फाशी द्यावी अशीही मागणी निशेध कर्त्यांनी केली आहे, जिल्ह्यात अकोला, मूर्तिजापूर, पातूर, बाळापूर, अकोट, बार्शिटाकळी येथे बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला. मूर्तिजापूर येथे करण्यात आलेल्या निषेध मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( शरद चंद्र पवार गट ) प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे,तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, प्रदेश संघटन सचिव रवी राठी,शिवसेना(उ. बा. ठा) तालुकाप्रमुख अप्पु तिडके, चंद्रकांत तिवारी,विनायक गुल्हाने, सुरेंद्र वरोकार, इब्राहिम घानिवाला, शेखर वाकोडे, असंघटित कामगार संघटनेचे दीपक खंडारे, कॉंग्रेसचे जितेंद्र गुल्हाने, सुनील वानखडे, नितीन गायकवाड, अनंत पांडे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
———————————-
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.
				[mc4wp_form]
By signing up, you agree to our 
Terms of Use and acknowledge the data practices in our 
Privacy Policy. You may unsubscribe at any time.