उद्या पासून शारदीय नवरात्रोत्सव…!
———————————
अकोला :- गणेशोत्सवानंतर सर्वांना नवरात्रोत्सवाचे वेध लागले आहे. देवीच्या मूर्तीवर कारागीर अखेरचा हात फिरवत असून, घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या असून, मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे.
उद्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. घटस्थापनेसह देवी मूर्तीची स्थापना करण्याची परंपरा असल्याने मूर्तिकारांकडून देवी मूर्ती साकारण्याच्या कामास वेग आला आहे.
यंदा कुठल्याही प्रकारचे निर्बंध नसल्याने उत्सव साजरे करणाऱ्या सार्वजनिक मंडळांची संख्याही वाढली आहे. त्यांच्याकडून देवी मूर्तींची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घरगुती देवी मूर्ती तयार झाल्या आहेत.
तर सार्वजनिक मंडळात स्थापन करण्यात येत असलेल्या मोठ्या मूर्तींचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही तासांतच त्यांचेही काम पूर्ण होणार आहे.
अवघे एक दिवस शिल्लक राहिल्याने मूर्ती साकारण्यासह विविध प्रकारच्या तयारीस वेग आला आहे. ३ फुटा पासून ८ ते ९ फुटापर्यंत देवी मूर्ती साकारल्या आहे. ३००० ते २१ हजारपर्यंत दर आहेत.
सप्तशृंगी, दुर्गा, रेणुका, महालक्ष्मी, कालिका देवी, महिषासुरनी अशा विविध मुर्ती तयार करण्यात आल्या आहे. दुर्गा देवीची सर्वाधिक मागणी असून त्यापाठोपाठ सप्तशृंगी देवी मूर्तीस जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या दरांमध्ये ५० रुपयांनी झालेली वाढ तसेच अन्य खर्चामुळे मूर्तीच्या दरांमध्ये ३० टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा देवी मूर्तींना ५० टक्क्यांनी मागणी वाढली आहे.
___________
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतीक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.