अट्टल दुचाकी चोरट्यास मूर्तिजापूर पोलीसांनी केली अटक
——————–
चोरट्यांकडून आठ दुचाक्या जप्त
———-
मूर्तिजापूर पोलीसांची मोठी कारवाई
————-
पावने चार लाखाचा मुद्देमाल जप्त
—————
अल्पवयीन मुलाच्या मदतीने चोरायचा दुचाकी
————
अकोला
मूर्तिजापूरात अलीकडे दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते, त्या संदर्भात पोलीस आरोपीच्या मागावर होते, नुकतीच एक दुचाकी चोरीची घटना घडली होती, या घटनेचा तपास करीत असताना पोलीसांनी सुगावा लावून २४ वर्षीय आरोपी आशिष दिनेश चव्हाण राहणार जामठी खुर्द तालुका मूर्तिजापूर याला अटक केली.
आरोपी आशिष दिनेश चव्हाण हा सराईत दुचाकी चोर असून तो एका अल्पवयीन मुलाच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकी चोरत होता, त्याने आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्याची माहिती मूर्तिजापूर पोलीस शहर स्टेशनचे ठाणेदार भाऊराव घुगे यांनी दिली, आरोपीच्या मुसक्या आवळल्या नंतर आरोपीकडून ३ लाख ७५ हजाराच्या चोरीच्या ८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. यापैकी चार दुचाकी मालकाचा शोध घेण्यात आला असून चार दुचाकी मालकाचा शोध सुरु आहे, ज्या कुणाच्या असतील त्यांनी मूर्तिजापूर शहर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, मूर्तिजापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे, पोलीस हवालदार सुरेश पांडे, नंदकिशोर टिकार, सचिन दांदळे, मंगेश विल्हेकर, पोलिस कॉन्स्टेबल गजानन खेडकर, सचिन दुबे, स्वप्नील खडे, गोपाल ठोंबरे यांनी केली. तसेच माना येथील पोलीस कॉन्स्टेबल जयकुमार मंडावरे, पो स्टे माना यांनी सहकार्य केले.
———————————- कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर ,CEN News अकोला