अकोला जिल्ह्याय विविध शासकीय कार्यालयात ७६ वा प्रजासत्ताक दिन संपन्न..!
—————————————
अकोला :- ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्य जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, विद्यालय, महाविद्यालयासह अकोला येथील शास्त्री स्टेडियम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते तर जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला चे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या ध्वजारोहण हस्ते संपन्न झाला.
अकोला येथील शास्त्री स्टेडियम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते पालकमंत्री पद भूषवल्यानंतर प्रथमच ध्वजारोहण संपन्न झाला. तर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात अकोला चे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते व मूर्तिजापूर येथील शासकीय क्रिडा संकुल मैदानात उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या हस्ते ७६ वा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्याने सकाळी ९ वाजता ध्वजारोहण संपन्न झाला. या वेळी मूर्तिजापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार हरिष पिंपळे, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, पोलीस निरीक्षक अजित जाधव, श्रीधर गुठ्ठे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आर. डी नवलकर, मुख्याधिकारी एस. एस. टाले, गट विकास अधीकारी अशोक बांगर यांच्या सह सर्व विभागाचे शासकीय अधिकारी वर्ग, कर्मचारी तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक रुंद उपस्थित होते. या वेळी पोलीस प्रशासना सह होमगार्ड, स्काऊट्स आणि गाईड्स, एन. सी. सी च्या वतीने म्हणवंदना देण्यात आली तर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमा नंतर मूर्तिजापूर तालुक्यातील विद्यालयाच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.
तर मूर्तिजापूर तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शहर व ग्रामीण पोलीस स्टेशन, नगर परिषद कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय, मध्य रेल्वे च्या स्टेशन प्रबंधक कार्यालय, रेल्वे सुरक्षा बल , शासकीय रेल्वे पोलीस आदी शासकीय कार्यालयासह तालुक्यातील विद्यालय व महाविद्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.