अकोला :- काँग्रेसने सुरुवातीपासून जाती-जातीत भेद
निर्माण केले. ओबीसी समाजाला काँग्रेसला पुर्णपणे विरोध आहे. एससी समाजाला सुद्धा संपवण्याचे काम काँग्रेस करीत आहे. एससी समाजाला कमजोर करून सरकार स्थापन करण्याचा कुटील डाव काँग्रेसचा आहे. यापासून जनतेने सावधान राहायचे आहे.
‘एक है तो सेफ है’ हे लक्षात ठेवा. बाबासाहेब आंबेडकरांसोबत जो अन्याय केला तसाच प्रकार आजही सुरुच असल्याचे सांगत जनतेने सावध राहण्याचे आवाहनही भाजप नेते तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (ता.९) अकोला दौऱ्यावर आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ मैदानावर दुपारी १२.३० वाजता आयोजित महाविजय संकल्प सभेला त्यांनी संबोधित केले. या सभेसाठी पश्चिम विदर्भातील महायुतीचे उमेदवार प्रामुख्याने उपस्थित होते.
काँग्रेसने सुरुवातीपासूनच दलीत समाजावर अन्याय केला आहे. त्याची अनेक उदाहरणे त्यांनी स्पष्ट केली. मात्र जोपर्यंत भाजप आहे तोपर्यंत या समाजावर अन्याय होणार नाही याची हमी मोदींनी दिली.
तुम्ही वादा करा मी पूर्ण करेल!
मागील दोन कार्यकाळात मोदींनी गरीबांना चार करोड पक्के घर दिले. जे लक्ष होते ते पुर्ण केले. आणखी डिमांड आली तसे आणखी तीन करोड घर बनवायला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील लाखो घरांचे स्पप्न पुर्ण होणार आहे. अकोल्यातील लोकांमध्ये मोठा जोर आहे. निवडणूक काळात लोकांना भेटणार तेव्हा कुणी परिवार असेल त्याचा पत्ता मला पाठवा. मोदी तुम्हाला पक्के घर देणार आहे.
माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहात…
७० वर्षावरील लोकांना मोफत उपचार गॅरंटीचा वादा केला होता. तो पुर्ण केला. या योजनेचा लाभ सगळ्याच प्रवर्गातील लोकांनी घेतला आहे.
लाडकी बहिण योजनेचा विस्तार करणार मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा सन्मान मिळाला आहे. केंद्रातील एनडीए सरकार महाराष्ट्रात पाहिजे आहे. हा आशीर्वाद पाहिजे आहे. महाराष्ट्रातील भाजपा महायुती आहे तर गती आहे. महाराष्ट्रची प्रगती आहे. महायुती सरकारचे पुढील पाच वर्ष कसे असतील हे वचननाम्यात दिले आहे.
माझी लाडकी बहिण योजनेचा विस्तार….
रोजगार, विकासाची कामे, स्वाभिमानी युवा शिक्षण, महायुतीच्या घोषणापत्रासोबत महाविकास आघाडीचे घोटालापत्र आले आहे. महाआघाडी म्हणजे करोडो रुपयांचे घोटाळे उघड झाले आहे. त्याचे अनेक किस्से सांगता येतील. जिथे काँग्रेस सरकार बनते तिथे शाही परिवारचा एटीएम बनते.
कर्नाटक, तेलगंणात वसुली डबल केली आहे. महाराष्ट्रात सावधान राहायचे आहे. महाविकास आघाडीच्या घोटाळ्यांचे एटीएम नाही बनू द्यायचे आहे. अकोला येथे कापूस पिकतो. टेक्सटाईल्स पार्कचा लाभ मिळू शकला नाही. कापूस उत्पादकांसाठी उद्योग व इंफ्रास्ट्कचर दोन्हींचा उदय होतो आहे.
शेतकऱ्यांच्या दुखाःची जननी काँग्रेस महाराष्ट्रात पाण्याचे संकट निर्माण झाले. मात्र त्यांनी काहीही केले नाही. सिंचनाचे प्रोजेक्ट्स जे फडणवीसांनी सुरु केले तेही बंद केले. महायुती सरकारच्या काळात पुन्हा वैनगंगा, नलगंगा, पैनगंगा, या नद्यांना लिंक करण्याची योजना दिली आहे. अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा, वाशीम व वर्धा जिल्हयातील पाण्याची टंचाई दूर होईल. ९० हजार करोडे रुपये यावर खर्च केल्या जाणार आहे. सुक्ष्म सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आर्थीक उन्नतीसाठी कटिबद्ध आहोत अशीही ग्वाही मोदींनी दिली.
राष्ट्र प्रथम ही भावना भारताची मोठी ताकद…
आज ९ नोव्हेंबर आहे आणि ही एक ऐतिहासिक तारीख आहे. २०१९ मध्ये याच दिवशी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिराबाबत निर्णय दिला होता. ९ नोव्हेंबर ही तारीख देखील लक्षात राहील कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येक धर्माच्या लोकांनी प्रचंड संवेदनशीलता दाखवली. राष्ट्र प्रथम ही भावना भारताची मोठी ताकद असल्याचे मोदी म्हणाले.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर,CEN News अकोला.