कल्याण ग्रामीणमधील घेसर गावात रेल्वे रुळांच्या लगत असलेल्या रस्त्याची दुरावस्था – तात्काळ दखल
कल्याण ग्रामीणमधील घेसर गावाच्या रेल्वे ट्रॅकजवळील रस्ता हा रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत येतो. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे आमदार श्री. राजेश गोवर्धन मोरे यांनी तात्काळ लक्ष घालून, संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून पाहणी केली. नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी योग्य ती कार्यवाही त्वरीत करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.