कल्याण पत्री पूलाजवळ कंटेनर उलटला
कल्याणच्या पत्री पुलाजवळ रस्त्याचा बाजूला कंटेनर उलटला. रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कंटेनर चालकाचा तोल गेल्याने ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. शीळ फाट्याहून कल्याणच्या दिशेने कंटेनर येत होता. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.