ब्रेकिंग न्यूज : दरवाढ व भोंगळ कारभाराविरोधात मनसे आक्रमक – केडीएमसी मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन
कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (K.D.M.C.) मनमानी दरवाढ व भोंगळ कारभाराविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) मुख्यालयासमोर तीव्र आंदोलन केले. या वेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि महापालिकेच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला.
मनसे नेते अविनाश जाधव यांचे मोठे विधान
या आंदोलनावेळी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मनसे व शिवसेना ठाकरे गट युतीबाबत मोठे वक्तव्य केले.
“उद्धव साहेबांकडे राज साहेबांचा नंबर आहे, फक्त एक फोन करावा – आम्ही तयार आहोत!”
असे जाहीर विधान करत त्यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गट युतीसाठी सकारात्मक संकेत दिले आहेत.
मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी कोणतेही पाऊल उचलायला आम्ही तयार आहोत, असेही जाधव यांनी ठामपणे सांगितले.
मुख्य मुद्दे:
-
महापालिकेच्या सेवा दरांमध्ये वाढ
-
कचरा व्यवस्थापन व पाणीपुरवठा यंत्रणेतील अकार्यक्षमता
-
सामान्य जनतेवर आर्थिक भार वाढण्याचा मनसेचा आरोप
मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनास इशारा दिला आहे की, जर लवकरच दरवाढ मागे घेण्यात आली नाही व भ्रष्ट कारभार थांबवला गेला नाही, तर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल.
ब्युरो रिपोर्ट – CEN NEWS, कल्याण