प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर,
पुणे येथे करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह आदी उपस्थित होते.
‘खजिन्याची शोधयात्रा’ या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली आहे. शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले