प्रशासनात लोकाभिमुखता आणणारा १०० दिवस या उपक्रमाचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला असून आगामी १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कामकाजाचा निकाल २ ऑक्टोबरला घोषित केला जाईल. या उपक्रमांतर्गत ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ चे व्हिजन डॉक्युमेट तयार करा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांबाबत प्रथम क्रमांक प्राप्त कार्यालयांचे सादरीकरण, सर्वोत्कृष्ट कार्यालयांना प्रशस्तिपत्र वितरण, उत्कृष्ट काम केलेल्या मंत्रालयीन विभाग व अधिकाऱ्यांचा गुणगौरव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह मंत्रीमंडळ सदस्य उपस्थित होते.
जनतेच्या आशा पूर्ण करण्यासाठी अधिक गतीने जनतेच्या हितासाठी कार्य करणे गरजेचे आहे. शंभर दिवसांचा आराखडा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर आता पुढील १५० दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून शासनाची प्रतिमा अधिक उंचावेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शंभर दिवसात सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या विभाग आणि अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
सविस्तर वृत्त : https://mahasamvad.in/165219/