- *क्रीडा संकुलातील अतिक्रमणावर बुलडोजर*
*कित्येक अनधिकृत वस्ती हटविली.न्यायालयाच्याआदेशाने कारवाईला वेग*
—————————————-
*शेगांव:-* शेगांव शहर व तालुक्याकरीता असलेल्या क्रीडा संकुलाच्या जागेवर असलेल्या अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्याकरीता जिल्हा प्रशासन व न्यायालयाच्या आदेशान्वये जाहीर नोटीस देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व कार्यदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने शेगाव येथील तालुका क्रीडा संकुला वरील अतिक्रमण काढण्यास आज सकाळपासून सुरुवात करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळ पासून क्रीडा संकुलावरील 192 झोपड्यांवर बुलडोजर आणि जेसीबी द्वारे अतिक्रमण काढण्यातयेत आहे. आज आणि उद्या असे दोन दिवस हि कारवाई चालणार असून कायदा व सुवव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विविध विभागाचे वरिष्ठ अधिकऱ्यांसह ३०० पोलिसांचा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.
……………………………
*जिल्हा प्रतिनिधी इस्माईल शेख Cen.news शेगाव -बुलढाणा*