भारतीय रेल्वे च्या विद्युतीकरणास झाले १०० वर्ष पूर्ण…!
मुंबई :- पुरातन काळापासून बघितल्या गेलं तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून भारत विकसणंशील रित्या विकासाच्या शिखरावर पोहचण्याच्या मार्गांवर आहे. याचाच एक भाग पहायला गेल्यास रेल्वे च्या बाबतीत गेल्या शतका पासून ते आतापर्यंत भारतीय रेल्वे चा मोठा विकास होत असल्याचे चित्र समोर दिसते.
आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय रेल्वेतील विद्युतीकरणास यशस्वी १०० वर्ष पूर्ण झाले आहे.सण ३ फेब्रुवारी १९२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते कुर्ला पर्यंत पहिली विद्युत वर चालणारी रेल्वे चालवण्यात आली याला आज ३ फेब्रुवारी २०२५ रोजी १०० वर्ष पूर्ण झाले. असून या निमित्याने ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनीत पहिल्या विद्युत लोको इंजिन पासून ते आता पर्यंत च्या विविध विद्युत लोको इंजिन्स सह लोकलच्या मॉडेल्स चा समावेश करण्यात आला आहे. तर रेल्वे प्रणालीत वापरण्यात येणाऱ्या विविध विद्युत उपकरणाचा समावेश असून यामध्ये खुद्द नागरिकांना रेल्वे इंजिन चालवण्याचा अनुभव ग्राफिक्स च्या माध्यमातून घेता येत असल्याने प्रदर्शनी पाहणाऱ्यांची मोठी गर्दी उसळली असल्याचे दिसत आहे.
—————————-
तेजस्वी जगताप, CEN news mumbai