मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींच्या दागिन्यावर च चोरट्यांनी केला हात साप..!
—————————————-
मूर्तिजापूर :- शहरात दिवसाढवळ्या विविध परिसरात तीन ठिकाणी महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना पुढे आली आहे. ही घटना मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मध्यवर्ती असलेल्या स्टेशन विभाग, डी. पी रोड व चिखली गेट परिसरात घडली असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.
सध्या सर्वत्र मकर संक्रांती निमित्य महिलांचे हळदी -कुंकू चा कार्यक्रम सुरु असल्याने शहरातील प्रत्येक रस्त्यांवर महिलेंची गर्दी पाहव्यास मिलते. परंतु याचाच फायदा घेत चोरटे ही कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. रस्त्याने हळदी-कुंकू च्या कार्यक्रमाला जाणाऱ्या – येणाऱ्या महिला ही भरदिवसा असुरक्षित असून केव्हा त्यांच्या दागिन्यांवर अथवा मौल्यवान वस्तूंवर चोरटे हात साफ करतील याची कुठलीच खात्री राहिलेली नाहीये. मूर्तिजापूर शहरातील स्टेशन विभाग, डी. पी रोड वरील डॉ शेळके हॉस्पिटल नजिक तर चिखली गेट परिसरात सायंकाळी ६ ते ८ वाजताच्या सुमारास अवघ्या २ तासाच्या कालावधीत चोरट्यांनी मुख्यमंत्र्यांच्या तीन लाडक्या भहिनींचे मंगळसूत्र हिसकावून पलायन केल्याची घटना शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. विशेष म्हणजे मुर्तीजापुर शहरात विविध ठिकाणी सदर तीन घटना घडल्यानंतर पुढे केवळ ३५ मिनिटांच्या फरकानेच जिल्ह्यातील बोरगाव मंजू येथेही एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्याची घटना घडली आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुर्तीजापुर शहरात चोऱ्यांचे प्रमाणात झापात्याने वाढ झाली असून अद्याप पर्यंतही चोरट्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही हे विशेष च.
ज्या राज्यात मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय..? असा सुर जनतेतून येत असून घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे, शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित जाधव एल. सी. बी पथकाचे गोपाल जाधव यांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही फुटेज अथवा आणखी काही सुगाव लागतो का याचा तपास करीत आहेत.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.