ऐतिहासिक वारसा असलेल्या पत्रकारितेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच राहणार- उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार.
पत्रकार दिनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन
प्रतिनिधी मुर्तिजापुर
पत्रकारितेला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे महाराष्ट्रातील पहिले वृत्तपत्र सुरू करून पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवली.त्यानंतर अनेक थोर पुरुषांनी पत्रकारितेच्या माध्यमातून समाज जागृत करण्याचे आणि घडविण्याचे उदात्य आणि महान कार्य केलेले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या पत्रकारितेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे असे प्रतिपादन आपले विचार व्यक्त करताना उपविभागीय अधिकारी संदीपकुमार यांनी केले. येथील पत्रकार बांधवांच्या वतीने भक्तीधाम मंदिर सभागृहात पत्रकार दिनाचे औचित्य साधून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. पत्रकार बांधवांनी एकाच भूमिकेत न राहता आपल्या कुटुंबासाठी देखील वेळ द्यावा.जेणेकरून दुहेरी भूमिका आपण निभावू शकू असे त्यांनी म्हटले.
यावेळी या सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले यांची उपस्थिती होती.तर तहसीलदार कु.शिल्पा बोबडे, वृक्षमित्र व पर्यावरण प्रेमी श्री.नाथन सर,ग्रामीण पत्रकार संघाचे राज्याचे उपाध्यक्ष पी.एन.बोळे,ज्येष्ठ पत्रकार प्रा.अविनाश बेलाडकर प्रा.दिपक जोशी यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.महाराष्ट्रात ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीदिन पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. यावेळी सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच्या वतीने.आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामगीताचार्य स्व.रामकृष्ण गावंडे तसेच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना श्रद्धांजली देण्यात आली. सूत्रसंचालन व प्रास्ताविक विलास नसले यांनी केले.आभार उबेद चाउस सर यांनी व्यक्त केले. पत्रकार दिनाच्या सोहळ्याला सर्वस्वी पत्रकार जयप्रकाश रावत,संतोष माने,संजय उमक,गौरव अग्रवाल, ॲड.निलेश सुखसोहळे,अतुल नवघरे,शेख मोईज शेख, धनराज सपकाळ, उबेद चाऊस,अथर हुसेन खान, प्रा.एल.डी.सरोदे, बबलू यादव,गजानन गवई,नरेंद्र खवले, विशाल नाईक,अनिल भेंडकर,उद्धव कोकणे, आकाश जामनिक, प्रकाश श्रीवास,अजय प्रभे,रवी शिंदे,प्रविण ढगे,दिलीप तिहीले, रोहित सोळंके,,सुमित सोनोने,पं.स.सदस्य प्रकाश वानरे, मुमताज खान,नरेंद्र वाढोणकर,दिलीप तिहिले,दिपक थोरात,संजय भड़के,राम महानकर, दिनेश श्रीवास,नागोराव तायडे,प्रेम शर्मा,महादेव पाटील,मोहम्मद शब्बीर,विलास सावळे यांची उपस्थिती होती.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.