पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चक्क आमदार हरिष पिंपळे यांनी खोलीत केले जेर बंद…!
—————————————-
मूर्तिजापूर :- येथील शासकीय विश्रामगृह येथे पिक विमा कंपनी च्या अधिकाऱ्यांना आ. हरिष पिंपळे यांनी एका खोलीत कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी वरून संतप्त आमदार यांनी अधिकाऱ्यांना शासकीय विश्रामगृहात एका खोलीत बंद करून ठेवले.
मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना सण २०२३ – २०२४ चे पीएम कृषी विमा लाभपासून कंपनीनी वंचित ठेवत शेतकऱ्यांशी जाणू विमा कंपनीच्या वतीने थट्टा करीत खेळ खेळत असल्याचे तसेच पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळत असल्याचे तालुक्यातील शेतक्यांनी तक्रार विद्यमान आमदार हरिष पिंपळे यांच्या कडे केली होती. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर संतप्त झालेले आमदार हरिष पिंपळे यांनी पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना मुर्तीजापुर येथील शासकीय विश्रामगृह येथे बोलावून ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना पिक विमा करिता यातना सोसाव्या लागत आहेत त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांना हि याची जाण व्हावी या उद्देशाने पिक विमा कंपनीच्या ५ अधिकाऱ्यांना एका खोलीत ४ ते ५ तास कोंडून ठेवल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुर्तीजापुर तालुक्यातील कुरूम परिसरातील ऐकूण ५३० लाभार्थी शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यापासून वंचित राहावे लागले या सर्वा मागे केवळ पिक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा दोष असून पिक विमा कंपनीचे अधिकारी शेतकऱ्यांना आर्थिक पिळवणूक ही करत असल्याचे गांभीर्य जनक तक्रार आमदार महोदय यांच्याकडे प्राप्त झाली यावरून आमदार हरिष पिंपळे यांनी सदर आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचे सांगण्यात येत आहे.
अखेर ४ते ५ तासा नंतर आमदार हरिष पिंपळे यांना जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी वंचित असलेल्या शेतकऱ्यांना येत्या आठवड्यातच पिक विमा मिळवून देण्याचे आश्वासित केल्यानंतर विमा अधिकाऱ्यांना सोडण्यात आले.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.