नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईत पर्यटकांची गर्दी..!
—————————————-
मुंबई :- सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी नवं वर्षाच्या पूर्वसंध्येला मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि गेटवे ऑफ इंडिया या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक आणि पर्यटकांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.
नाताळ च्या सुट्टया अंन नववर्षाच्या स्वागता करिता मुंबईकर मोठे उत्सुक झाल्याचे दिसत असून गेट ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, जुहू चौपाटी, सिद्धिविनायक मंदिर आदी ठिकाणी नागरिकांनी व पर्यटकांनी मोठी गर्दी केली.
पाश्चात्य रुढीनुसार, मंगळवार ३१ डिसेंबर हा वर्षातील शेवटचा दिवस आहे. सन् २०२४ ला निरोप देण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जुन्याला निरोप देण्याबरोबर येणाऱ्या नव्याचं स्वागत करण्यासाठी मुंबईकरांची हक्काचे सेलिब्रेशन स्पॉटस् ठरलेले आहेत. समुद्रकिनारा तर मुंबईचं वैशिष्ट्य आणि मुंबईबाहेरच्या लोकांच्या आकर्षणाचा विषय! यात मुंबईतील मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी शिवाय देशाचं प्रवेशद्वार म्हणजे गेट वे ऑफ इंडिया परिसर लोकांनी फुलून गेलेला आहे. तर गर्दी च्या ठिकाणी कुठलीही घटना घडू नये या करिता मुंबई पोलीस प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेण्यात आली असून मध्य रेल्वेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल (RPF) च्या वतीने सुरक्षा वाढवण्यात आली असून डॉग स्कॉट च्या वतीने प्रवाशांच्या सामानांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तर गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल, मरीन ड्राईव्ह आदी परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला असून मुंबईत ठिकठिकाणी चेक पोस्ट लावण्यात आले आहेत.
—————————————-
कॅमेरामन अमेय आगळेकर सह ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News मुंबई.