परभणी हिंसाचार प्रकरणात अंजनगावात वंचित च्या वतीने जाहीर निषेध
अमरावती :- १० डिसेंबर रोजी परभणी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरील संविधान प्रतिकृतीची अवमानना झाल्याची घटना घडलीये. या घटनेच्या निषेधार्थ ठिक-ठिकाणी तीव्र आंदोलन पुकारण्यात आले. पोलिसांनी खऱ्या आरोपींना न शोधता आंदोलन कर्त्यांवर कोंबिंग ऑपरेशन सुरू केले. त्यामध्ये पोलीस कस्टडीमध्ये घेतलेले विधीज्ञ (लॉ)चे शिक्षण घेणारे विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कष्टडीमध्ये मृत्यू झाला. त्याची चौकशी करून दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. आणि निरपराध लोकांचे कोंबिंग ऑपरेशन थांबवावे. या करिता वंचित बहुजन आघाडी अंजनगाव सुर्जी च्या वतीने मागणी करण्यात आली आहे. असे निवेदन तहसीलदार अंजनगाव सुर्जी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. यावेळी तालुका अध्यक्ष रोशन इंगोले, उपाध्यक्ष पंकज वारुळे, माजी अध्यक्ष सुनील राक्षसकर, महेंद्र वानखडे, नंदू वानखडे, विपिन अनोकार, राजेंद्र वानखडे, सौदागर, शेख समीर, विजय इंगळे, संघरतन सरदार, रत्नदीप रायबोले, रोहित इंगळे, विजय वानखडे, रोशन इंगळे, आकाश इंगळे, विलास इंगळे, कुलदीप वानखडे, गणेश धुळे, अनिल लव्हाळे, प्रभाकर लव्हाळे, सुरज वानखडे, रत्नदीप लबडे, रोशन लबडे, रामराव वानखडे आदी उपस्थित होते.
—————————————-
प्रतिनिधी कैलास वाकपांजर सह विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अमरावती.
![YouTube player](https://i.ytimg.com/vi/HjTnV6GMF20/maxresdefault.jpg)