मूर्तिजापूरात भरदिवसा पुन्हा घर फोडी..!
पोलीस सुस्त, चोट्टे मस्त..
—————————————-
मूर्तिजापूर:- शहरात गेल्या काहीदिवसांपासून घरफोड्यांचे सत्र थांबता, थांबता थांबेना.
चोरट्यांनी अवघ्या ७२ तासात पुन्हा भरदिवसा घरफोडी केल्याची घटना समोर आलीये. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसातील ही सहावी घटना असून अद्याप कुठल्याही घटनेचा आरोपी पकडण्यात पोलीस अपयशी झाले आहेत. यामुळे मात्र नागरिक असुरक्षित असल्याच्या चर्चेला शहरात उधाण आले आहे.
मूर्तिजापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी नगर येथील एका घराचे भरदिवसा कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना रविवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते १०. ४५ च्या दरम्यान उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी गोपालसिंग प्रतापसिंग राठोड वय ८० वर्ष राहणार श्री छत्रपती शिवाजीनगर मूर्तिजापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ते व त्यांचा परिवार नेहमीप्रमाणे आठवड्यातून एकदा म्हणजेच दर रविवारी धार्मिक कामासाठी सत्संगामध्ये सहभागी होण्यासाठी सकाळी ८ वाजता घराला कुलूप लावून सहपरिवार सत्संगाला गेले होते, आणि धार्मिक काम आटपून घरी परत आले असता घरच्या दाराचे कुलूप तोडलेल्या अवस्थेत आढळून आले. व दार आत मधून लावलेले दिसले त्यामुळे त्यांनी आपल्या नातवाला घरच्या मागच्या दिशेने असलेल्या दारातून प्रवेश करायला सांगितले.असता ते ही दार उघडलेल्या अवस्थेत दिसले. नातवाने आतून जाऊन दरवाजा उघडला असता घरातील कपाटातील कपडे वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने घरात शोध घेतला असता कपाटातील सोन्याच्या दागिन्याच्या ५ अंगठ्या प्रत्येकी एक तोळा, एक सोन्याच्या दागिन्याचे बिस्कीट ज्याचे वजन अडीच तोळा व ३० हजार रोख रक्कम असे एकूण किंमत फक्त १ लाख ५० हजार रुपयांची चोरी झाल्याचे पोलिसांच्या सांगण्यात आले आहे.
यावर घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक अजित जाधव आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल होऊन पाहणी केली.
पुढील तपास शहर पोलीस स्टेशन चे निरीक्षक अजित जाधव यांच्या मागदर्शनात उप-पोलीस निरीक्षक गणेश सूर्यवंशी, गजानन ताठे ,नंदकिशोर टिकार,मुन्ना पांडे,सचिन दुबे, अनिल राठोड,मंगेश विल्हेकर, पवण बोडखे करीत आहेत.
—————————————————————————— शहरात वाढत्या चोरीचे प्रमाण लक्षात घेता कर्मचारी शोध मोहीमेसाठी पाठविले असून सदर प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे शहर पोलीस स्टेशन चे वरिष्ठ अधिकारी अजित जाधव यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
————————————–
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.