निवडणूक प्रक्रियेतील फिरते पथक नावापुरतीच…?
—————————————-
फिरते पथकातील कर्मचारी कर्तव्यावर असताना मारतात दांडी..!
—————————————-
निवडणूक फिरते पथकातील कर्मचाऱ्यांची दांडीयात्रा..
—————————————-
अकोला /मूर्तिजापूर :- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने गठीत करण्यात आलेल्या FST १ व FST २ असे दोन पथक नेमण्यात आले आहे. सदर पथक हे १२ -१२ तासांच्या दोन शिफ्ट करण्यात आल्या आहेत.
त्यापैकी FST १ मधील पथक प्रमुख दिनांक १० नोव्हेंबर च्या मध्यरात्री चक्क आपल्या कर्तव्यावर नसल्याचे CEN News ने केलेल्या पाहणी ( स्ट्रिंग ऑपरेशन ) मध्ये आढळून आले आहे.
निवडणूक प्रक्रिये दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नये या करिता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या आदेशान्वये FST १ व FST २ असे दोन भरारी पथक नेमण्यात आले आहेत. मात्र अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर येथे १० नोव्हेंबरच्या मध्यरात्री FST १ मध्ये रात्रपाळीला रात्री ८ ते सकाळी ८ वाजेपर्यंत कर्तव्यावर असणारे पथक प्रमुख महादेवराव सरप हे चक्क मध्यरात्री १२ वाजून ४२ मिनिटांनी मुर्तीजापुर वरून अकोल्याला सेवाग्राम एक्सप्रेस ने गेल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे सदर पथक प्रमुख हे गेल्या कित्येक दिवसांपासून राज्यात आदर्श आचारसंहिता लागल्यापासून रात्रपाळी असल्यावर पथकातील इतर कर्मचाऱ्यांना घरी जाऊन आराम करा व मी अकोला येथे जातो असे पथकातील काही कर्मचाऱ्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
सर्व सामान्य नागरिकांनी आदर्श आचारसंहिता दरम्यान उल्लंघन केल्यास त्या व्यक्तीस कठोर शिक्षा अथवा दंड थोठविला जातो मात्र आता चक्क आदर्श आचारसंहितेचे शासकीय कर्मचारीच नियमाचे उल्लंघन करत असतील अथवा या दरम्यान सदर विधानसभेत कसलाही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण..? असा प्रश्न या निमित्याने उपस्थित होत असून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर निवडणूक विभाग काय कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले असू आहे.
याबाबत मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्याशी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रतिक्रिया विचारल्या असता आपण लेखी तक्रार द्या दोशींवर योग्य ती कारवाई करू असे सांगण्यात आले.
—————————————-
विदर्भ ब्युरो चीफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.