मुर्तीजापुर विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुका मोठ्या प्रमाणात विकासापासून वंचित राहिला असून आगामी निवडणुकीत जर मला या मतदारसंघात जनतेच्या आशीर्वादाने लोकसेवा करण्याची संधी प्राप्त झाल्यास प्रथमतः
मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर अनुसरून सर्वप्रथम गोरगरीब मुलांसह इतरांना शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करण्यावर भर देऊन आज मूर्तिजापूर शहरात पिण्याच्या पाण्याची समस्या ही बिकट झाली आहे यावर तज्ञांचे मत घेऊन कार्य करेल असे AIMIM चे उमेदवार सम्राट सुरवाडे आपच्या वृत्त वाहिनीशी बोलत होते. AIMIM चे उमेदवार सम्राट सुरवाडे यांच्यावतीने अखेर च्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने शक्तिप्रदर्शन केले.यावेळी उमेदवार सम्राट सुरवाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी शपथ घेत जोपर्यंत मुर्तीजापुराचा विकासाचा मार्ग मी मोकळा करणार नाही तोपर्यंत मी चप्पल घातल्याविनाच बाहेर पडण्याचा निर्धय केला.
___________
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.