अन तिकीट जाहीर होताच आमदार हरिष पिंपळे झाले भावुक..!
___________
कार्यकर्त्यांचा फटाके फोडून वर एकमेकांना पेढे वाटून जल्लोष.
____________
मुर्तीजापुर विधानसभेच्या तिढा सुटला, भाजपचे उमेदवार हरीश पिंपळे च
___________
अँकर :- अकोल्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात अखेर भाजपकडून आमदार हरीश पिंपळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मोठ्या प्रतीक्षेनंतर भाजपने पिंपळे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर होताच आमदार हरीश पिंपळे यांचे अश्रू अनावर आले. ते ओक्साबोक्शी रडले. या मतदारसंघात हरीश पिंपळे यांचं तिकीट कापले जाणार अशी चर्चा रंगली होती. अखेर पिंपळे यांना सलग चौथ्यांदा संधी देण्यात आली असून मी त्याच सोन करून दाखवेलच. त्यामुळे हरिष पिंपळे यांना कार्यकर्त्यांसमोर अश्रू अनावर झाले. हा कार्यकर्त्यांचा विजय असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
___________
कॅमेरामन श्याम वाळस्कर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.