आता श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात ” सिटी स्कॅन ” ची सेवा..!
_________________________________
अकोला :- मूर्तिजापूर येथील श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ, जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत नवीन सिटी स्कॅन सेंटरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून, आता तालुक्यातील रुग्णांना ” सिटी स्कॅन ” साठी तालुकासोडून अकोल्यात येण्याची गरज भासणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक संचालक डॉ. आरती कुलवाल होत्या. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार हरीश पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून डॉ.तरंगतुषार वारे,जिल्हा शल्य चिकित्सक , डॉ. नरेंद्र भागवत न्युरोसर्जन, रुग्ण कल्याण समितीचे सुनील लशुवाणी, बंडू पाटील लांडे, सुभाष गोसावी, भाजपा तालुका अध्यक्ष भूषण कोकाटे, मा. नगराध्यक्षा मोनालीताई गावंडे, भाजपा शहराध्यक्ष रितेश सबाजकर, प्रतिष्ठित नागरिक, खासगी वैद्यकीय व्यावसायीक, वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र नेमाडे, कृष्णा डायग्नोस्टिक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी डॉ.परिमल सावंत, निर्मल संचेती, धीरज टांक, प्रणय पंथ, किशोर गीते, बाबाराव दुबे, कपिल देशमुख, अमित धारक उपस्थित होते. सूत्रसंचालन अजयसिंग चव्हाण यांनी केले, तर आभार सहाय्यक अधिकारी सेविका अनिता पजई यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी अधिपरिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.
_________________________________
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News मूर्तिजापूर -अकोला.