अत्रज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू
————–
जीवंत बिबट्यासोब घेतला नागरीकांनी सेल्फीचा आनंद
———-
तडफडून झाला बिबट्याचा मृत्यू
——–
नादखेड – भंडारज गांवा दरम्यान घडली घटना
———
वन विभागाचे कर्मचारी पोहोचले उशीरा
——–
अकोला
पातुर तालुक्यातील नांदखेडा ते भंडारज फाटा दरम्यान एका चार वर्षीय बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला.
घटना घडली त्यावेळेस बिबट्या जीवंत अवस्थेत होता याटनेची माहिती लगेचच स्थानिक नागरीकांनी वन विगाला दिली परंतू वन विभागाचा कुठलाही कर्मचारी अथवा अधिकारी वेळेवर घटनास्थळी पोहचला नसल्याने बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची बाब समोर आलीय. चार ते साडेचार वर्षाचा तरुण बिबट्याला धडक लागली त्यावेळेस बिबट जीवंत होता, त्याला वाचविण्यासाठी कुठलीही हालचाल झाली नसल्याने त्याचा मृत्यू झाला उलट नागरीकांनी सदर घटनेची मजा घेत त्याच्या सोबत फोटो सेशन केले, बिबट्याच्या मृत्यू नंतर वन विभागाने त्याला ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घेऊन गेले असले तरी या गंभीर घटनेची कसून चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे महत्त्वाचे आहे.
————–
सुमित गुल्हाने सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर , CEN News , अकोला
[mc4wp_form]
By signing up, you agree to our
Terms of Use and acknowledge the data practices in our
Privacy Policy. You may unsubscribe at any time.