राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या राजभवन येथील निवासस्थानी प्रतिष्ठापना केलेल्या श्री गणरायाचे बुधवार (११ रोजी) राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी मूर्तीचे समुद्रात विसर्जन न करता ते कृत्रिम हौदात करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली होती.