मूर्तिजापूरात बदलापूर व अकोलाच्या घटनेचा रास्ता रोको आंदोलन करून निषेध..!
———————————
अकोला :- कोलकत्ता, बदलापूर, नाशिक, अकोला येथील महिला मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या एकापाठोपाठ घडलेल्या घटनांमुळे जिल्हा देखील हादरला असून मूर्तिजापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्या व शिवसेना(उ. बा. ठा) गटाच्या वतीने रस्त्यावर येत आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला . महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गट व शिवसेना(उ. बा. ठा) गटाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको करण्यात आला. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) व शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौका व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली. व आरोपीस कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.
केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मूर्तिजापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून रास्तारोको करण्यात आला. दरम्यान महिला, मुलींच्या संरक्षणासाठी केंद्र आणि राज्य सरकार कुचकामी ठरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, त्याचबरोबर घडलेल्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
या रास्तारोको व निषेध आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गट व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी(श. प) गटाचे प्रदेश सरचिटणीस तेजस जामठे,ऍड. भैय्यासाहेब तिडके,रा. कॉ. पा प्रदेश संघटन सचिव रवी राठी, तालुकाध्यक्ष मंगेश कुकडे, महिला तालुकाध्यक्षा सौ. रंजना सदार, निखिल ठाकरे, शिवसेना (उ. बा. ठा) गटाचे तालुका प्रमुख अप्पूदादा तिडके, शहर प्रमुख विनायक गुल्हाने, गजानन चौधरी, बंडू पाटील लांडे, शिवसेना शेतकरी आघाडी तालुका अध्यक्ष रुपेश कडू, पंचायत समिती उपसभापती देवाशिष भटकर, चंचल येवले, युवासेना तालुकाध्यक्ष अक्षय लकडे, महिला आघाडी ता. अध्यक्ष रेखाताई कराड, ऋषभ ठाकरे, ज्योतीताई लोखंडे, शोभाताई चव्हाण, सुमित्रा बावणे, छाया इंगळे, लक्ष्मी इंगळे, हेमंत कांबे, संतोष टापरे, संतोष कुरील, सुधाकर जामनिक, गौतम कांबळे, अजय एखंडे, भूषण वरोकार, पूर्वेश मोगल, शिवा कदम,ऋषी ठोकळ, पवन गुंजाळ, उज्वल शेवतकर, कार्तिक आसरे, व्यंकटेश पळसोकर, वनीष इंगळे, सौरभ क्षीरसागर आदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) गट व शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————-
कैमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर, CEN News अकोला.