मूर्तिजापूरात ‘हर घर तिरंगा’ रैली संपन्न..!
मूर्तिजापूर :- भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन १५ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या वर्षीही ‘हर घर तिरंगा’ मोहीम ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबवण्यात येत आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावी, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याकरिता अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या आठवणी करीता नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा लाववा असे आवाहन मूर्तिजापूर चे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी केले ते मूर्तिजापूर येथे आयोजित “हर घर तिरंगा यात्रा रैली च्या कार्यक्रमात बोलत होते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून काढण्यात आलेल्या रॅलीला आमदार हरिष पिंपळे यांनी हिरवी झेंडी दाखवून घरोघरी तिरंगा मोहिमेचा शुभारंभ केला. या वेळी मूर्तिजापूर चे उपविभागीय अधिकारी संदिपकुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे, न. प चे प्रशासक तथा मुख्याधिकारी शेषराव टाले, नायब तहसीलदार उमेश बनसोड यांनी स्वतः तिरंगा घेऊन रेलीत सहभाग नोंदविला.
हर घर तिरंगा मोहिमेनिमित्त ९ ते १५ ऑगस्टदरम्यान विविध कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक घरावर १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि राष्ट्रध्वजासोबतचा सेल्फी काढून harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावा. असे ही या वेळी कळविण्यात आले आहे. तर १५ आगस्ट दिनी आमदार हरिष पिंपळे संत गजानन महाराज बहुदेशीय संस्थेच्या वतीने एक झाड व एक तिरंगा ध्वजा चे वितरण राबवणार असल्याचे या वेळी आमदार हरिष पिंपळे यांनी बोलतांना सांगितले. रैलीत यावेळी शहरातील भारतीय ज्ञानपीठ विद्यालय, गाडगे महाराज विद्यालय, श्री व्यंकटेश बालाजी हायस्कूल, आदर्श कन्या विद्यालय, परमानंद मालानी हायस्कूल, इंटरनॅशनल स्कुल ऑफ इंटिग्रेटिव्ह एज्युकेशन मुर्तीजापुर आदी शाळांनी आपला सहभाग नोंदविला. यावेळी माजी नगर सेवक भरत जेठवानी, राहुल गुल्हाने, चंदन अग्रवाल, विलास वानखडे आदी कार्यकर्ते, माजी नगरसेवक, शासकीय कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग, विध्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. ” हर घर तिरंगा रैली चे समारोपण नगर परिषद येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नगर परिषदेचे प्रकल्प अपधिकारी राजेश भुगुल तर कार्यक्रमाचे नियोजन उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे, सुभाष म्हैसने,संजय इसाळकर,आरोग्य निरीक्षक विजय लकडे,विजय कोरडे, केतन चिंचमलातपुरे, विलास वनस्कार, विलास ठाकरे, नितीन शिंगणे आदिनी केले.