अकोल्यात थरारार ‘द बर्निंग बस’ ४४ प्रवाशी सुखरूप
अकोला :-
राष्ट्रीय महामार्गावर शेगाव वरुन येणाऱ्या शिवशाही बसने दुपारी दीड वाजताच्या दरम्यान रिधोरा गावाजवळ अचानक पेट घेतला. या बसमधून ४४ प्रवाशी प्रवास करीत होते, सर्व प्रवाशी अक्षरशः मरणाच्या दारातून परत आले.
या शिवशाही बस मध्ये सुरुवातीला काहीतरी जळत असल्याचे चालकाच्या लक्षात आले पहाता पहात आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने बसचा कोळसा झाला. पण चालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व प्रवासी सुखरूप बचावले. चालकाने बस थांबवताच प्रवाशांनी भराभर बसमधून उतरुन आला जीव वाचववीला. यावेळी प्रसंगावधान राखले नसते तर मोठा अनर्थ झाला असता. अकोला शहराच्या बाहेर हॉटेल तुषार जवळ ही दुर्घटना घडली असून त्यातील प्रवाशी केवळ नशीब बलवत्तर म्हणून वाचले.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News , अकोला.