राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक #कौशल्य दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळाद्वारे प्रशिक्षणार्थी व उत्कृष्ट
औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, विभागाचे सचिव गणेश पाटील, आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, व्यवसाय व शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे संचालक दिगंबर दळवी उपस्थित होते.
कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. उद्योजकांना त्यांच्या क्षेत्रातील कार्यकुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी राज्य शासन चांगला प्रयत्न करत आहे – केंद्रीय राज्यमंत्री श्री. आठवले
कौशल्य विकास विभाग, उद्योजक यांच्या समन्वयातून राज्यात सर्वाधिक रोजगार निर्माण केले जातील – मंत्री श्री. लोढा