महान धरणावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न..!
———————————-
अकोला : – मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजरच्या वतीने महान येथील धरणावर दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि तीन दिवस सराव कवायती पार पडल्या.
काटेपूर्णा डॅम आणि श्री क्षेत्र वाघागड हॉल येथे प्रशिक्षण पार पडले. यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील नवीन अपडेट, स्वीमिंग मेथड, रंगीत तालीम, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक संमेलन, आपत्ती व्यवस्थापन निवारणासंबंधित शोध व बचाव साहित्य गॅलरी प्रदर्शनीत शोध व बचाव साहित्यांची ओळख आणि त्यास हाताळण्याची पद्धती आणि मानवनिर्मित वा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत निर्माण होणाऱ्या घटनांशी तसेच पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर शोध व बचाव मोहीम राबविण्याची पद्धती, रोप क्लायमिंग, बिल्डिंग डेमो, धरणात स्वीमिंग मेथड, पुरात वाहून जाणाऱ्या तसेच पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याच्या पद्धती, संबंधित कवायती धरणात करून दाखविण्यात आल्या. उद्घाटन पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय प्रतिनिधी गोपाल मुकुंदे, पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता इंगोले, पाठक, आदींच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. बार्शीटाकळी तहसीलदार राज वजीरे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, पुरवठा अधिकारी गुप्ता यांच्या उपस्थितीत सराव प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आल्या. विषेशतः पथकात आपत्कालीन परिस्थितीत महिलांचे संरक्षण व सुरक्षासंदर्भात १५ मुलींची टीम ही तयार करण्यात आली आहे, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.
———————————-
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.