मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा येथे कॉलरा साथीचा उद्रेक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण..!
अकोला जिल्हातील मूर्तिजापूर तालुक्यात असलेल्या दहातोंडा येथील एक रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असताना कॉलरा चाचणीमध्ये बाधित आढळून आला आहे. या गावात कॉलराचा उद्रेक जाहीर करण्यात आला असल्याने मूर्तिजापूर तालुक्यात नागरिकांमध्ये मोठे भितीचे वातावरण पसरले आहे. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पाच पथकांनी प्रत्यक्ष दहातोंडा येथे जाऊन प्रतिबंधात्मक तथा उपचारात्मक कारवाई केली.
बुधवार, ३ जुलै रोजी सायंकाळपर्यंत ५ सर्वेक्षण पथकांनी २६० घरांची तपासणी केली. त्यामध्ये ११६० लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या. परंतु यातील एक रुग्ण वगळता कुठलाही रुग्णात कॉलरा बाधित आढळून आला नाही. अतिसार, उलटी, हगवण याचे एकही रुग्ण आढळून आले नसल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. तपासणी पथकामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक ५, आरोग्य सेविका ५, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका ५ यांचा समावेश असून यांच्यामार्फत दहातोंडा गावातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत.
गावकऱ्यांना पिण्याचे पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी मेडीकोर देण्यात आले असून नागरिकांना आरोग्य शिक्षणातंर्गत पाणी निर्जंतुक करुन पिण्याबाबत माहिती देण्यात आली.
विलगीकरण कक्ष व संदर्भ सेवा सद्यःस्थितीत साथ नियंत्रणात असून गावातील नागरिकांना उपकेंद्रात विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निगराणीत आरोग्य सेवा पुरवण्यात येत असून संदर्भ सेवा पुरवण्याकरिता रुग्णवाहिका उपलब्ध ठेवण्यात आली आहे. जिल्हास्तरीय अधिकारी व मूर्तिजापूर चे उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसीलदार श्रीमती शिल्पा बोबडे यांच्या प्रतक्ष भेटी व गावातील पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून जिल्हास्तरीय यंत्रणेच्या पथकाने दहातोंडा येथे भेट देवून संबंधीत अधिकारी व कर्मचारी यांना साथ नियंत्रणाकरीता सूचना दिल्या. अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दूरध्वनीद्वारे उद्रेकाची माहिती घेऊन परिस्थिती नियंत्रणात आनण्या करीता सूचना आरोग्य विभागाचे अधिकारी यांना दिले.
कॅमेरामन शाम वाळसकर सह विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.