नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या शपथविधीचा मुर्तीजापुरात जल्लोष..!
मूर्तिजापूर :-” नरेंद्र मोदी जी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाले असून देशाची सेवा करण्यास सज्ज झाले, आगामी पाच वर्षांमध्ये विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी काम सुरू होईल मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आपल्या पाच वर्षाचा काळ पूर्ण करून पुढील पाच वर्षाची पायाभरणी देखील करेल असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक वारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्याच्या जल्लोषा वेळी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी यांची देशाचा पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा निवड झाली असून याचा जल्लोष मूर्तिजापूर भाजपा व शिवसेना शिंदे गटाच्या वतीने मोठ्या उत्साहात एकमेकांना पेढे भरवून करण्यात आला.
मूर्तिजापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठ्या संख्येने जमलेले भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच ढोल ताशा वाजवून फटाके फोडत एकमेकांना मिठाई भरवत आनंद उत्सव व्यक्त केला.यावेळी ढोल ताशांच्या तालावर कार्यकर्त्यांनी नृत्यही केले. तद नंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार घालून अभिवादन करण्यात आले. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन चौक, पोळा चौक मार्गे मंगळवार बाजार रोड मार्गे जयस्तंभ चौक येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय पर्यंत पदयात्रा काढण्यात आली यावेळी पदाधिकाऱ्यांकडून मतदात्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. जल्लोष वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक भारतीय जनता पक्षाच्या व शिवसेनाच्या झेंड्यांनी बहरून गेला होता. यावेळी कार्यकर्त्यांकडून ” भारत माता की जय, जय श्रीराम ” च्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य विनायक वारे, शहराध्यक्ष रितेश सबाजकर(गुप्ता), शिवसेना तालुकाप्रमुख दीपक पाटील दांदळे, भाजपा उपाध्यक्ष कमलाकर गावंडे, भाजयुमो तालुकाध्यक्ष पप्पू पाटील मुळे, सचिन खरतडकर, संजय डागा, माजी नगराध्यक्षा सौ मोनाली गावंडे, राधाताई तिवारी, अनिता देवीकर, विजया कंझरकर, राहुल गुल्हाने, हर्षल साबळे, उमेश चिंते, विकास कुरेकर, सुधाकर गोपकर, अविनाश यावले, अमोल पिंपळे, निलेश वानखडे, राजेंद्र हांडे, राजू कांबे, रोहित अवलवार, विजय डोईफोडे, प्रमोद टाले आदी भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————————-
विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर CEN News अकोला.