सकारात्मक स्टेप्स: दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी महाराष्ट्र सरकारचं प्रस्ताव
सकारात्मक स्टेप्स: दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी महाराष्ट्र सरकारचं प्रस्ताव
#दिव्यांग शिक्षकांच्या समायोजनासाठी महाराष्ट्र शासन सकारात्मक असून तसा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राष्ट्रीय दृष्टीहीन संघांच्या निवेदनाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीस शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव सुमंत भांगे, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा) प्रदीपकुमार डांगे उपस्थित हाेते.